वेकोलीने केले बंद पडलेल्या ओपन कास्ट खदानीचा भरणा सुरू

381

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

बिआरएसपी जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांच्या प्रयत्नाला आले यश. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून सुरेश पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली वे.को.ली यांना निवेदन देण्यात आले की घुग्घुस व चंद्रपूर येथील भोवतालच्या वे.को.ली ने कोळसा उत्पादन करण्या करीता सर्वत्र जमीनीवर उत्खनन करण्यात आले परंतु कोसळण्याची उत्खनन संपल्यानंतरही वे.को.लि ने उत्खनन केलेल्या जमीनीवर बंद पडलेल्या खदानीचा पुन्हा भरण केलेले नाही ज्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी स्तरावर गेली आहे आणि ह्या बंद पडलेल्या कोळसा खाणी मुळे इथे मोठ मोठे अपघात सुध्दा घडत आहे जर का या सर्व बंद पडलेल्या कोळसा खदानीचा भरणा करण्यात आला तर ही जमीन येणाऱ्या पिढीला शेती करण्यास उपयोगांसाठी येऊ शकते इथे एक वस्ती निर्माण होऊ शकते ह्या सर्व गोष्टींचा विचार करून जमीनची र्‍हास होणार नाही व लोकांना ही जमीन जिवनामध्ये खुप मोठी मदत होईल. उष्ण वातावरण निर्माण होने, पशु-पक्षी व वन्य प्राणी मात्रांचा वृक्ष तोडीमुळे तुटवडा निर्माण होणे, वृक्षांची तोड-मोड करून पर्यावरणात बिगड पाळणे , लोकवस्तीचा उजाड करणे असे अनेक कारणाने पर्यावरणाचा समतोल या खदानीच्या उत्खननामुळे बिगडलेला आहे. ही समतोल सदेव टीकुन ठेवण्यासाठी व घुग्गुस चंद्रपूरच्या बिगडत्या वातावरणाकडे लक्ष देत बि.आर.एस.पी चे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली वे.को.ली ला निवेदन देण्यात आले की तात्काळ या उत्खनन केलेल्या खानिचे भर टाकून भरणा करण्यात यावा. वेकोली ने या निवेदनाची दखल घेत तात्काळ बंद पडलेल्या ओपन कास्ट खदानीचा भरणा करण्याचे काम सुरू केले व येणाऱ्या पिढीला हि जमीन लवकरच वापरण्यात येणार असे बि.आर.एस.पी चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांनी सांगितले व BRSP संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सुरेश माने सर यांचे खुप खुप आभार मानले व मुख्य प्रबंधक उदयजी कावडे वेकोली ताडालीचे आभार मानले व सोबतच आव्हान केले की संपूर्ण जिल्हातिल बंद पडलेल्या कोळसा खाणी लवकरात लवकर भरणा करून नागरिकांना इथे शेती व्यवसाय कायम राहण्यासाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्हातिल खदानीच्या सुद्धा लवकरात लवकर भरणा सुरू करुन लोकांना शेती करण्यासाठी ही जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून आंदोलन सुरू असे आवाहन चंद्रपूर बि.आर.एस.पी चे जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी केले .या वेळी उपस्थित युवा अध्यक्ष ईश्वर बेले, राकेश पारशिवे, इरफान पठाण होते