लोकमान्य टिळक महाविद्यालयात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” संपन्न….

44

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
मो-7875380754

वणी: दिनांक 12/03/2021 पासून लोकमान्य टिळक महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमा अंतर्गत विविध
स्पर्धाचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 03/04/2021 व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान या विषयावर प्रा. डॉ. रेखा बडोदेकर
(इतिहास विभाग प्रमुख लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी) यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दुर्लक्षित राहिलेल्या महिलांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले आणि भारतातील सर्व क्षेत्रातील श्रीमंत-गरीब अशा सर्व क्षेत्रातील महिलांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे,असे ठासून सांगितले. आणि भारतातील जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या भागातील महिलांचे योगदान उदाहरण देऊन महत्त्व सांगितल.

दिनांक04/04/2021 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान विषय: “स्वतंत्र भारतातील तरुणा समोरील आव्हाने” हा विषय होता. प्रमुख वक्ते विलास न.दवणे होते. यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त असणे आणि राष्ट्राचे हिताकरिता, सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात राष्ट्रभक्त म्हणजे कोण, जे काही आपण कार्य करतोय ते निष्ठेने करणे म्हणजे राष्ट्रभक्ती, परोपकार, आणि सर्वांचेहित हे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारावे आणि युवकांनी व्यसनापासून दूर रहावे आणि जबाबदारी स्वीकारावी मग ती कोणत्याही क्षेत्रातील जबाबदारी असेल तर असे आव्हान केले.

सोबतच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला निबंध स्पर्धेचा विषय: “महापुरुषांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान” हा होता आणि या स्पर्धेत विजयी विद्यार्थी अनुक्रमे कु. भावना गुडेकर , कु. अनुष्का उईके , कु. लिखिता भूम्बर या विद्यार्थिनीनि नंबर पटकावले

तसेच भिंती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विजय विद्यार्थी कु. साक्षी गुप्ता, आणि कु. स्नेहा कुंभारे या होत्या रंगोली स्पर्धे मधे कु.रिचा मडावी, कु.अमीषा खडसे, कु. काजल पुरामशेट्टीवार, कु. सुचिता पारखी विजयी ठरल्या. सोबतच स्लोगन कॉम्पिटिशन मधे मुस्कान सय्यद, कु. भावना गुडेकार, कु. काजल पुरामशेट्टीवार यांनी आपल् यश नोंदवल. अशा भरगोच स्पर्धेचे आयोजन या महोस्तवा च्या प्रसंगी करण्यात आले.
महात्मा जोतीबा फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करुण आजादी का अमृत महोस्तवचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात स्वातंत्र्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी सकारात्मक घ्यावा असे आवाहन केले. कायम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नीलिमा दवणे (राष्ट्रीय सेवा कार्यक्रमाधिकारी) केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा आणि वेगवेगळ्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि विजय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे घोषित केले व विद्यार्थांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार
प्रा.किशन घोगरे ( राष्ट्रीय योजना सह. कार्यक्रमाधिकारी) यांनी मानले. आणि समारोप करण्यात आला.