सावली तालुक्यांतील 27 ग्रामपंचायतीच्या कारभारी बनल्या महिला 

83

सावली (सुधाकर दुधे )
सावली तालुक्यात नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत 50 ग्रामपंचायत्तीपैकी 27 ग्रामपंचायतिच्या सरपंचपद नवख्या महिलांनी भूषविले आहे तर 11 ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदावर महिला विराजमान झाल्या आहेत तसेच 3 ग्रामपंचायतिवर सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे महिलांनी भूषवल्यामुळे सदर ग्रामपंचायचा कारभार सांभाळण्याची संधी नवख्या महिलांना मिळाली आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळालेल्या 50 टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही गावाचा विकास करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलबध झाली आहे सावली तालुक्यातील 54 ग्रामपंचायतपैकी 50ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले त्यानुसार नुकत्याच सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या यामध्ये 27 ग्रामपंचायतिचे सरपंचपद महिलानि पटकविले असून उपासरपंच म्हणून 11 ग्रामपंचायत मध्ये महिला विराजमान झाल्या तर तीन ग्रामपंचायत वर सरपंच व उपसरपंच पदी महिलांची वर्णी लागलेली आहेत
एकूण 11 ग्रामपंचायत मध्ये महिला उपसरपंच पदी यामध्ये खेडी ग्रामपंचायत मध्ये मुक्ताबाई गर्तुळवार, चांडली बुज. मनीषा मोहुर्ले, व्याहाड खुर्द. भावना बीके, कापसी. शारदा कोहळे, अंतरंगाव. सुषमा ठाकरे, गायडोंगरी. दीपमाला निकुरे, विहीरगाव. भरती कालभैँधे, बोरमाळा. रागीना घोडमारे, नि. फेठगांव. लता मेश्राम, मेहबुज. शारदा भोयर, व कढोली ग्रामपंचायत मध्ये सुमन गेडाम आदी महिलांची निवड झाली आहे.
सावली तालुक्यातील तीन ग्रामपंचायत व्याहाड खुर्द, कापसी व निलसनी पेटगांव यामध्ये सरपंच व उपसरपंच पदी महिलांनी पटकवली आहेत त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येऊन पडली असून ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील यात शंका नाही.
*’या महिलांकडे आली गावाची सूत्रे,*
चारगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी ज्योती बहिरवार, चकपीरंजी उषा गेडाम, कवठी कांताबाई बोरकुटे, व्याहाड खुर्द. सुनीता उरकुडे, कापसी. सुनीता काचिन्वार, सोनापूर. जयश्री मडावी, सामदा बुज. शुभांगी मडावी, हरांबा. अश्विनी बोदलकर, डोनाळा.किरण रायपुरे, चिखली. रेखा बांनबले, घोडेवाही. गीता चौधरी, मुंडाळा. उर्मिला बोरकर, पाथरी. अनिता ठीकरे, करगाव. कल्पना वाढई, केरोडा. सोनी राऊत, आकापूर. मामिता गुरनुले, गेवरा खुर्द उषा आभारे, कसरगाव. भावना चुधरी, नी. पेटगांव. शुभांगी बरसागडे, कोंडेखल. सरला कोटंगले, करोली. शिला लोहबरे, पालेबरसा. मंदा मडावी, उसरपार चक. वैशाली सोनकर, उपरी कुमुद सातपुते, जांब बुज. वर्षा गेडाम, पेंडरी. ठुमादेवी वलादे, हिरापूर. प्रीती गोहणे आदी महिलांची सरपंचपदि वर्णी लागली.
सर्वात कमी वयाची सरपंच महिला,
तालुक्यातील 50 ग्रामपंचायत निवडणूक होऊन नुकतीच सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाली यामध्ये 27ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी महिलांची वर्णी लागली असून सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून उपरी येथील सरपंच कुमुद दिलखुष सातपुते वय (23) यांची निवड झाली आहे.