हरणाच्या पळसाला जीवनदान..! ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती

194

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील वणी वारूळा मुंडगाव मार्गावरील किकोर नाल्याजवळ हरणाच्या पिल्लावर श्वानांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात हरीण जखमी झालं. हे दृश्य पत्रकार स्वप्नील सरकटे व काही युवकांच्या दृष्टीस पडलं. त्यांनी ताबडतोब शेतातील दोन मजुरासह त्या हरणाच्या पळसा जवळ धाव घेतली आणि त्या हरणाच्या पळसाला श्वानांपासून रक्षण केलं. जखमी अवस्थेतील त्या हरणाच्या पळसाला मुंडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.त्यानंतर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. यावेळी अजय इंगळे, सिद्धार्थ घनबहादुर, दिपक म्हैसने, निलेश सरकटे विकास सरकटे, डॉ. गणेश राहाटे, डॉ. राहुल सरकटे पत्रकार स्वप्निल सरकटे व वन कर्मचारी आदी उपस्थित होते.