गडचिरोली जिल्ह्यचा विकास करण्याची क्षमता ना. एकनाथ शिंदे साहेबात.

0
274

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी

पालकमंत्री पदी ना. वडेट्टीवार यांना कायम ठेवण्याची मागणी पूर्णतः चुकीची.-शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे। गडचिरोली- शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली व मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जिल्हानिहाय पालकमंत्री पदाचे न्यायपूर्ण वाटप केले. गडचिरोली जिल्ह्यच्या मागासलेपणाचा कलंक दूर सारण्यासाठी महाराष्ट्रातील कार्यक्षम, विकासाची दूरदृष्टी असलेले कॅबिनेट मंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्री पद स्वीकारले. जिल्ह्यतील पालकमंत्री पद वजनदार मंत्री व विकासकार्याचे निर्णय जलदगतीने घेण्याची क्षमता असलेल्या नेत्याकडे गेल्याने जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु दुर्दैवाने कोरोनाचे संकट जगभरासह देश आणि राज्यावरही आले.या कठीण परिस्थितीत ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्री पद असलेले ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्पुरता स्वरूपात पालकमंत्री पदाचा कार्यभार ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता.तेव्हा गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी व शिवसैनिकांनी कोणताही विरोध न करता मोठ्या मनानी ना. विजय वडेट्टीवार यांचे स्वागत केले.परंतु आता जिल्ह्यचे पालकमंत्री पद ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ठरल्याप्रमाणे सोपविण्यात आल्यानंतर,महाविकास आघाडी ने सर्व सहमतीने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करून जिल्ह्यतील कांग्रेसच्या एका गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तात्पुरत्या प्रभार सोपविलेल्या कांग्रेसच्या मंत्र्यालाच पालकमंत्री पदी कायम ठेवावे यासाठी जी मागणी केली आहे ती पूर्णतः चुकीची व हास्यास्पद आहे.आजपर्यंत जिल्ह्यत कधी जिल्ह्याचा स्थानिक प्रतिनिधी व जिल्ह्याचा विकास हे समीकरण दिसून आले नाही.विदर्भातील केवळ दोनच जिल्ह्यत पालकमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला आले. विदर्भात पालकमंत्री पदाच्या बाबतीत कांग्रेसला झुकते माप देण्यात आले तरीही गडचिरोली जिल्ह्यातील कांग्रेसच्या एका गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पदी कांग्रेसच्या मंत्र्यांना ठेवण्याचा आग्रह करण्याचे वर्तन हे आघाडीच्या धोरणाला विरोध करणारे व न शोभणारे आहे.आघाडी धर्माचे भान ठेवून कांग्रेस ने वागायला पाहिजे असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी म्हटले. सोबतच ना.एकनाथ शिंदे साहेब तळागाळातुन संघर्षातुन वर आलेले नेतृत्व असून जिल्ह्यच्या विकासकार्याला गती देण्याची व जिल्ह्यचे मागासलेपण दूर करण्याची क्षमता असेलेले नेते आहेत,ना. शिंदे साहेब आघाडी सरकार चे वजनदार मंत्री असल्यामुळे जिल्हा विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेलेले प्रकल्प मार्गी लावण्याची क्षमता ना. शिंदे साहेब यांच्यात आहेत.त्यांच्या पालकमंत्री पदी नियुक्ती ने जिल्ह्याचा मागासलेपणाचा कंलक दूर होण्यास मदत मिळणार आहे.जिल्ह्यच्या विकासासाठी कांग्रेसकडे काही मास्टर प्लॅन असल्यास तो त्यांनी सांगावा ना.शिंदे साहेब हे महाविकास आघाडीचे व विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणारे मंत्री असल्यामुळे त्यांची समस्या व त्यांच्याकडे असलेला विकासाचा प्लॅन ते नक्कीच एकूण घेतील व त्यांच्या समस्याचे निराकरण करतील यात तिळमात्र शंका नाही त्यामुळे त्यांच्या सारखे कार्यक्षम मंत्री जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभणे हे जिल्ह्यच्या दृष्टीने अभिमानाची व भाग्याची गोष्ट असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी म्हटले आहे.