विष्णुपंत गावंडे अभ्यासिकेत आंबेडकर जयंती निमित्त लाईव्ह व्याख्यान

43

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विष्णुपंत गावंडे अभ्यासिका मध्ये डॉ. गणेशराव इंगळे व कपिल ढोके‌ यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
उन्नती अकॅडमी व विष्णुपंत गावंडे अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्किटेक अनंतराव गावंडे हे होते तर कार्यक्रमाला प्राचार्य वाल्मीकराव भगत ,दिवाकर गवई ,टी एस रायबोले, अविदादा गावंडे, एस. के. सावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर गणेशराव इंगळे यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय देत बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे नऊ भाषा अवगत करून चौसष्ट विषयांवर प्रभुत्व मिळवले होते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्याचे अनुसरण करावे असा सल्ला दिला तर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते कपिल ढोके यांनी आपल्या व्याख्यानात बाबासाहेबांचा परिचय सर्वांना राज्यघटना लिहिणारे एवढाच आहे. मात्र यासोबतच बाबासाहेबांनी युवकांकरिता, स्त्रियांकरिता, बहुजन समाजाकरिता केलेले अनेक दुर्लक्षित कार्याची माहिती यावेळी सर्वांना दिली. समाजसेवी अनंतराव गावंडे यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीकांत साबळे प्रवीण भगत,मनाली गावंडे,अंदूरकर,पलश सावळे यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम हा फेसबुक लाईव्ह व झूम ॲप दारे लाईव्ह करण्यात आला होता कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशांत सावळे यांनी केले कोरोनाचा प्रकोप पाहता हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.