खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हडपसर येथील मगर पट्टा सिटी येथील वॅक्सीनेशन केंद्राची केली पाहणी

67

 

पुणे : पुण्यातील वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव पहाता सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले आहे.
हडपसर येथील मगर पट्टा सिटी येथील वॅक्सीनेशन केंद्राला भेट देऊन खासदार कोल्हे यांनी पाहणी केली. सदर वॅक्सीनेशन केंद्रात असलेल्या सुविधांचा आढावा घेऊन डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, डॉ.शंतनु जगदाळे, नंदुकाका मगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान वॅक्सीनेशनसाठी आलेल्या नागरिकांशीही संवाद साधला. वॅक्सीन घेतल्यानंतर सुरुवातीला जाणवणारा त्रास व कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेऊन झाल्यावर किती दिवसांनी शरीरात अॅण्टिबॉडिज तयार होतात याची माहिती देऊन तोपर्यंत काळजी घ्या. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळण्याचे आवाहन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.