देसाईगंज मधील एकाच कुटुंबातील 5 कोरोना बाधित

337

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज- दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता. देसाईगंज/वडसा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील इतर पाच नवे कोरोना बाधित आढळून आले. आंबेडकर वॉर्ड येथील दोन दिवसांपूर्वी एक जण कोरोना बाधित आढळून आला होता. आरोग्य विभागाने कळविल्याप्रमाणे त्या कुटुंबातील व्यक्तींनी अमरावती येथे प्रवास केला होता. दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 23 व्यक्तीचा रॅपीड कोरोना ऐंटेजन तपासणी करण्यात आली. यापैकी 5 जण कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले. यामध्ये आजी, पत्नी, भाऊ व इतर सदस्यांचा समावेश आहे. या ठिकाणी 156 व्यक्तींच्या समूहाचे प्रतिबंधात्मक क्षेत्र दोन दिवसांपूर्वीच लावण्यात आलेले आहे.