समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…..

72

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

वर्धा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्य सिव्हिल लाईन वर्धा येथील पुर्णाकृती पुतळ्याला समता सैनीक दल वर्धा युनिटच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करत अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे, मार्शल चंदू भगत, पहेलवान मार्शल मारोतराव डंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यांनतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून उपस्थित सर्व मार्शलच्या वतीने मानवंदना देऊन घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी उपस्थित बांधवांना मार्शल मधुर येसनकर यांनी प्रतिबद्धतेची शपथ दिली.
यावेळी कार्यक्रमाला समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे, सहसंघटक मार्शल अविनाश गायकवाड, जिल्हा समन्वयक मार्शल गौतम देशभ्रतार, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मार्शल मधुर येसनकर, तालुका संघटक मार्शल मनोज थुल, तालुका संघटक महिला विभाग मार्शल सुजाता वाघमारे, शहर संघटक महिला विभाग मार्शल उषाताई मात्रे, मार्शल चंदू भगत, मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल हर्षल गजभिये, मार्शल रणजित कांबळे, मार्शल विनय गौरखेडे, मार्शल पुंडलिक गाडगे, पहलवान मार्शल मारोतराव डंभारे, मार्शल दिगांबर लांबे, मार्शल सु्ष्टी अलोणे, मार्शल सायली अलोणे, डॉ. अनुश्री मात्रे, डॉ. प्रियंका मात्रे, आंबेडकरी पत्रकार संघाचे सचिव मार्शल प्रदीप भगत, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल दिवे, मार्शल सांची गायकवाड, मार्शल विशाल कांबळे, मार्शल निखिल वागदे, मार्शल अभिषेक मात्रे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.