चंद्रपूर चे पालकमंत्री की घोषणामंत्री:देवेंद्र बेले नगर सेवक

614

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर(चंद्रपूर): दि.१५ एप्रिल २०२१ ला पालकमंत्री यांनी चंद्रपूर मध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन कोविड रुग्णांन साठी उपलब्ध होणार अशी घोषणा केली, परंतु अजून पर्यंत चंद्रपूर मध्ये कुठेच रेमडेसीवीर इंजेक्शन चंद्रपूर मध्ये मिळत नाही, आज तर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शन नाही, चंद्रपूर मध्ये महाभयंकर परिस्थिती आहे अश्या वेळी पालकमंत्री फक्त घोषणा देत आहे, प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी शून्य
कोविड टेस्टिंग केल्यानंतर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना कुठेच जागा नसल्याने त्यांना घरी पाठवत आहे, व ते कोविड रूग्ण बेड साठी सर्वी कडे फिरत आहे, व कुठेच बेड मिळत नसल्याने ते रुग्ण जिल्हा रुग्णालय समोर बसून आहे, या भयंकर परिस्थितीला जबाबदार कोण?
आणि चंद्रपूर चे पालकमंत्री अजून ही फसव्या घोषणा देत आहे,
म्हणून सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की किमान १५ दिवस घरी राहा बाहेर बिन कामासाठी घरा बाहेर पडू नका आता आपणच आपले रक्षक बना