शिध्दांत गेडाम दहाविच्या बोर्ड परिक्षेत गुणानुक्रमे चिमूर तालुक्यात पहिला.. — कु.शिवाणी आदे व कु.मानसी गोहणे,यांचा तालुक्यात दुसरा,तिसरा क्रमांक..

शुभंम पारखी
ग्रामीण तालुका प्रतिनिधी चिमूर
न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथील इय्यता दाहावीचा विद्यार्थी शिध्दांत कवडुजी गेडाम हा बोर्ड शालांत परीक्षेत ९४/४०,टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.याच बरोबर शिध्दांत हा चिमूर तालुक्यात गुणानुक्रमे पहिला ठरला आहे.
तद्वतच कुमारी शिवाणी ज्ञानेश्वर आदे या विद्यार्थ्यांनीने दाहावीच्या बोर्ड शालांत परीक्षेत ९३ टक्के गुण घेत तालुक्यात गुणानुक्रमे दुसरा क्रमांक पटकावला आहे.कु.शिवाणी ही विकास विद्यालय शंकरपूर येथील विद्यार्थीनीं आहे.”तर,कुमारी मानसी श्रावण गोहणे या विद्यार्थ्यांनीने दाहावीच्या बोर्ड शालांत परीक्षेत ९२/८० टक्के गुण घेत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.ती जनता विद्यालय भिसी येथे शिकत होती.