पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या मधस्तीने 5 दिवसा नंतर आशांचे ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे… जानेवारी ते एप्रिल पर्यंत वाढीव चार हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आयुक्तांनी केले मान्य….

542

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक
————————————–
चंद्रपूर:–कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिका स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर यांना जानेवारी पासून चा थकीत मासिक चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा व इतरही प्रलंबित मागण्यासाठी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात सोमवार पासून मनपा कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते 4 दिवस होऊनही मनपा प्रशासन लक्ष न दिल्यामुळे आयटक चे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी व गोपाल अमृतकर यांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ मा. विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री यांची दि.16 एप्रिल रोजी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन मासिक चार हजार रू.वाढीव प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची विनंती केली असता नामदार वडेट्टीवार साहेबांनी आयुक्त सोबत लगेच भ्रमणध्वनी द्वारा चर्चा केली असता जानेवारी पसुनचा थकीत चार हजार रुपये वाढीव प्रोत्साहन भत्ता एप्रिल 2021 पर्यंत देण्याचे मान्य केल्याने 5 व्या दिवशी मनपा कार्यालय समोर सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

मनपा स्तरावर सर्व आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महा आयुष सर्वे करणे, कोविड-19 शी निगडित इतर कामे अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करीत आहेत. सदर बाबी हया कामाचा भाग असल्या तरी देखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता आगस्त ते डिसेंबर 2020 पर्यंत अदा करण्यात आला आणि जानेवारी पासून पुढे देण्यास मनपा प्रशासन चाल ढकल करीत आहे. सध्या कोविड मूळे सर्व आशा वर्कर ला मूळ काम करता येत नाही आणि सध्या फक्त कोविड सर्वेक्षण व त्या अनुषंगाने ईतर सर्व कामे त्यांच्यावर बळजबरीने लादत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. चंद्रपूर शहर मध्ये कोविड-19 अनुषंगाने अनेक कामे दररोज 8 ते 9 तास सर्व आशा वर्कर करीत आहेत तेव्हा त्यांना तातडीने जानेवारी पासून चा थकीत चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता अदा करण्यात यावे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे अनेक आशा वर्कर ला मोबदला मिळाला नाही तर काही आशाना कामे करूनही कमी मोबदला मिळाला तेव्हा हा थकीत मोबदला प्रतिदिन 150 रू. प्रमाणे तातडीने अदा करण्यात यावे.सर्व आशा वर्कर ला सन्मानाची वागणूक देण्यात यावी.नियमित केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावा व या पुढे दर महिन्याच्या 1 तारखेला आशांच्या बँक खात्यात मोबदला जमा करण्यात यावा. राज्य सरकारने वाढवून दिलेले नोव्हेंबर महिन्या पासूनचे थकीत मासिक दोन हजार रुपये मानधन वाढ त्वरित देण्यात यावी.पालकमंत्री आशा भाऊबीज योजने अंतर्गत 1100 रू.त्वरित जमा करण्यात यावे.

संदर्भ क्र.7/34/2021 दि.31/3/2021 च्या मनपा कार्यालयाने काढलेल्या पत्रा नुसार आशा वर्करला अनेक कामे करण्याची सक्ती लादण्यात आली आहे व जाचक अटी शर्ती पण आहेत आणि त्या नुसार कामे केली नाही तर 1500/-रू.चे वाऊचर देणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे तेव्हा संदर्भिय पत्र तातडीने रद्द करून आशांना योग्य वागणूक देण्यात यावी. मागील वर्षी फरवरी 2020 मध्ये काही नवीन आशा वर्कर नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्या कडून सर्व काम 7 महिने नियमित करवून घेण्यात आले परंतु कामावरील मोबदला मात्र तुमची ट्रेनिंग झाली नाही म्हणून देता येणार नाही असे सांगितल्या जात आहे, तेव्हा ट्रेनिंग न होता सर्व कामे करवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून सबंधित आशांना मोबदला अदा करण्यात यावा किंवा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. काही झोन मध्ये आशा वर्कर सर्व कामे करीत असताना जर त्यांच्या कार्य शेत्रात गरोदर मातेची केस मिळाली नाही तर त्यांना त्या महिन्यात अहवाल वाउचर दिल्या जात नाही त्यामुळे सबंधित आशा वर्कर ला वाढीव मानधन पासून वंचित राहावे लागते तेव्हा ही अट रद्द करण्यात यावी. यासह अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. शेवटी पालकमंत्री व आयुक्त यांच्या आश्वासनानी तात्पुरते ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, गोपाल अमृतकर, आशा वर्कर संघटनेच्या शहर अध्यक्ष वैशाली जुप्पाका, सचिव प्रतिमा कायारकर, सविता गटलेवार, सुकेषणी शंभरकर, कल्पना बावणे सह शहरातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.