कोरोना रुग्णांसाठी रिक्षाची मोफत सेवा देणार घाटकोपर मधील रिक्षा चालक व शिक्षक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार

122

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर (मुंबई उपनगर )दि.१६ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत कर्तव्य व जबाबदार नागरिक म्हणून संचारबंदीच्या काळात कोविड रुग्णांना मोफत रिक्षा सेवा देण्याचा निर्णय रिक्षा चालक व शिक्षक असणारे घाटकोपरचे दत्तात्रय सावंत यांनी घेतला आहे. घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मधील कोरोना रुग्णांना संचारबंदीत घर ते रुग्णालय असा मोफत रिक्षा प्रवास देण्याचा निर्णय रिक्षाचालक व शिक्षक दत्तात्रय सावंत यांनी घेतला आहे या साठी मला ८६५२२६१८३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दत्तात्रय सावंत यांनी केले आहे
घाटकोपर पश्चिम साईनाथ नगर येथील ज्ञानसागर विद्या मंदिर या शाळेत दत्तात्रय सावंत हे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.शाळेचे अधिवेशन झाल्यानंतर रिकाम्या वेळेस रिक्षा चालवतात आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावतात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान संचारबंदीत कोरोना रुग्णांना वाहनांची अडचण ठरू नये यासाठी दत्तात्रय सावंत यांनी घर ते रुग्णालय ही सेवा २४ तास मोफत देणार असल्याचे सांगितले.
दत्तात्रय सावंत यांच्या या पुढाकाराला साथ देत स्थानिक नगरसेवक व बाजार उद्यान समिती मनपा उपाध्यक्ष सुरेश पाटील व भाजपा वार्ड क्रमांक १२९ चे नगरसेवक सूर्यकांत जयहरी गवळी यांनी रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायजर कॅन दिल्याचे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले

शिक्षक /आर .एस. पी.आधिकारी./ समाजसेवक / रिक्षा चालक दत्तात्रय सावंत यांचे उल्लेखनीय कामे
ज्ञानदानाचे पावित्र काम करत असताना आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो या पवित्र भावनेने मागील कडतर लाॅकडाऊन काळात भिमाशंकर परिसरातील आदिवासी भागातील गोरगरीब जनतेला मुक्ता देवी संस्थेच्या माध्यमातून अन्न धान्य वाटप केले. तसेच आदिवासी विभागातील लोकांना कपड्याचे वाटप देखील त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा पथकाच्या माध्यमातून सांगली येथे आलेल्या महाभयंकर प्रलयंकारी महापूर आला होता त्यावेळी त्यांनी महापूर ग्रस्ताना कपड्याचे वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षा पथकाच्या माध्यमातून फुटपाथवर असणार्‍या लोकांना कपड्याचे वाटप करण्यात आले
तसेच संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित संत गाडगे महाराज मंगलम धर्मार्थ निवास नवी मुंबई येथे कॅन्सर ग्रस्त रुग्णांना फळे व अन्न वाटप करण्यात आले