पँथर संघटना दर्यापूरच्यावतीने नाचून नव्हे तर वाचून हा उपक्रम राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

54

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-दर्यापूर येथील पँथर संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वि जयंती नाचून नव्हे तर वाचून हा उपक्रम राबवून साजरी करण्यात आली
दर्यापूर येथील शिवाजी चौकात बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यावेळी दर्यापूरचे तहसिलदार डॉ योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश आत्राम, पि एस आय खंडारे, डॉ महेंद्र कांबळे उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्व मान्यवराना भारतीय संविधान भेट देऊन सत्कार करण्यात आला नाचून नव्हे तर वाचून हा शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल मान्यवरांनी आयोजकाचे कौतुक केले
या कार्यक्रमाला पँथरचे यश कांबळे, अनिकेत गावंडे, रोहित खंडारे, सचिन इंगळे, राजकुमार सावळे, तेजस नितनवरे व इतर उपस्थित होते