जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकला पेंटीपाका येथे अडविले सामाजिक कार्यकर्त्यांनी सिनेस्टाईलने पकडले ३९ जनावरे जिवंत तर १३ चा मृत्यू

233

 

उपसंपादक /अशोक खंडारे

छतिसगड कडून तेलंगणा कडे जनावरे कतलीसाठी नेत असलल्या ट्रकला पेंटीपाका येथे सिनेस्टाईल ने सामाजिक कार्यकर्त्यांनी हुशारीने नियोजन करुन अडविण्यात यश मिळवले आहे.
हरी ओम रोड लाईन्स चा ट्रक क्रमांकCG 04 JB 0126 ने गोवंश जातीचे जनावरे छतिसगड कडून तेलंगणा येथे कत्तलखान्यात नेत असल्याचे विस्वासनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेंटीपाका येथील सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला व गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यांवर ट्रॉक्टर चे केसबील ठेवून ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला परंतू ट्रक भरपूर वेगाने चालवित होते म्हणून ट्रकच्या मध्ये केसबिल फसले त्यामुळे एक्सल तुटले व ५००मीटरवर ट्रक थांबले तेव्हा चालक व सोबती पळून गेले.
सदर ट्रकमधून जनावरांना काढण्यात आले तेव्हा ३९ जनावरे जिवंत तर १३ मृत पावलेल्या आढळून आल्या.
पुढील कारवाई करण्यात येणार आहे.