Home अकोला पाचकोर प्लाॅट परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी भुमिपुजन

पाचकोर प्लाॅट परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी भुमिपुजन

126

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्र. ७ मधील पाचकोर प्लाॅट परिसरात जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती तसेच मनस्ताप सोसावा लागत होता.नागरिकांचा जलवाहिनी मुद्दा समस्या नगरसेवक तथा शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांनी अग्रक्रमी ठेवत वेळोवेळी न.पा.प्रशासनाला धारेवर धरत सुचना देत पाठपुरावा करत रेटुन धरला होता.
दि۔३०-जुलै रोजी कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी मंजुर झाली व त्यांच्या हस्ते भुमिपुजन कार्यक्रम सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करत पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शहराचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, उपनगराध्यक्ष अबरार खाॅ.शमशेर खाॅ. नगरसेवक पुरूषोत्तम चौखंडे तर प्रमुख उपस्थित पाणी पुरवठा सभापती मंगेश पटके नगरसेवक मनोज चंदन तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleविदर्भ राज्य आंदोलन समितिच्या जिल्हा संघटकपदी राजु पिंपळकर तर मंगेश रासेकर यांची जिल्हा सरचिटनिसपदी नियुक्ती
Next articleशिध्दांत गेडाम दहाविच्या बोर्ड परिक्षेत गुणानुक्रमे चिमूर तालुक्यात पहिला.. — कु.शिवाणी आदे व कु.मानसी गोहणे,यांचा तालुक्यात दुसरा,तिसरा क्रमांक..