कुरुड ग्रामपंचायतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची केली सोय – नवीन पिण्याच्या पाणी टँकरचे लोकार्पण

60

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्याची गावातील नागरिकांना धावपळ व टंचाई भासू नये याकरिता मराठी नववर्ष व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत कुरुडच्या वतीने सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांचे हस्ते नवीन स्टेनलेस स्टीलच्या पिण्याच्या पाणी टँकरचे लोकार्पण करण्यात आले.
पिण्याचे पाणी टँकरमुळे कुरुड वासीय जनतेला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याने लग्नकार्य,सामाजीक कार्यक्रम यासाठीही याचा लाभ होणार आहे.यामुळे कुरुड वासीय जणतेंनी नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
टँकरचे लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच क्षितिज उके,ग्रामविकास अधिकारी संजय चलाख,अविनाश गेडाम,विलास पिलारे,शंकर पारधी,पलटूदास मडावी,प्रवीण उईके,रेखाताई मडावी,पुजा डांगे,आशाताई मीसार,प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक,कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक वृंद व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.