पोलीस स्टेशन र्तफैपारशिवणी येथे पायदळ रुंटमार्च काढण्यात आले.भाजीपाल्याची दुकाने शुक्रवार पासून तकिया मारोती मंदिर समोर लावण्यात यावे .

103

 

पाराशिवनी तालुक प्रातिनिधी
दखलन्युजभारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र ):-पारशिवनी तालुक्यात व शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा नागरिकांन द्वारे शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन न होत असल्यामुळे पारशिवनी पोलींसा द्वारे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांचा मार्गदर्शनात रुट मार्च काढुन नागरिकांना राज्य शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करुन कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सहकार्य करावे असे आव्हाहन पालिस निरिक्षक वेरागडे यानी केले आहे .
राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन मृत्युचे प्रमाण झापाट्याने वाढत असल्यावर ही पारशिवनी शहरात नागरिकांना द्वारे राज्य शासनाच्या नियमाचे पालन न होत असल्यामुळे आज गुरुवार दिनांक १५ एप्रिल रोजी ११:३० ते १२:३६ वाजता च्या दरम्यान पारशिवणी टाऊन येथे श्री संतोष वैरागडे पोलीस निरीक्षक पो स्टे पारशिवणी येथे पायदळ रुंटमार्च काढण्यात आले असुन हे रुट् मार्च पारशिवनी पोलीस स्टेशन ते मेन रोड बाजार चौक , बाजार चौक ते बैंक आॅफ इंडिया समोरुन शिवाजी चौक , शिवाजी चौक ते किराणा ओली पेंच रोड , पेंच रोड ते पोलीस स्टेशन पारशिवनी येथे समाप्त करुन राज्यात कोरोनाची रूग्ण वाढत असून मुत्युचे प्रमाण वाढत असून नागरिकांना सोशल डिस्टन ठेवण्या बाबत तसेच तोंडाला मास्क लावण्याबाबत सॅनिटायजरच जास्तीत जास्त वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मार्केट मध्ये भाजीपाल्याची व किराणा दुकान एकाच ठिकाणी असल्याने जास्त गर्दी होत असल्याने भाजीपाल्याची दुकाने ही उद्या शुक्रवार पासून तकिया मारोती मंदिर समोर लावण्यात यावे असे सूचना पोलिस निरिक्षक संतोपा वैरागडे यांनी यावेळी देण्यात आली. .
या प्रसंगी श्री संतोष वैरागडे पोलीस निरीक्षक, पौलीस उप निरिक्षक संदिपान उबाळे, ज्ञानेश्वर चिमुरकर ( खुपिया विभाग) ,मुद्दसर जमाल ,संदिप कडु,अमोल मेघरे, महेन्द जळीतकर, सह यांचा उपस्थितीत स्टमाची मध्ये 02 अधिकारी व 22 पोलीस कर्मचारी 15 होमगार्ड हजर होते