अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यात आदिवासी बांधवांचे सरसकट लुट घरगुती साहित्य ज्यादा दराने बिल न देता संक्रात सिजन म्हणून उधारी विक्री

127

 

संपादक//जगदिश वेन्नम

गडचिरोली:-जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड,एटापली तालुक्यातील अति दुर्गम भागातील गावामध्ये तेलंगणा राज्यातून काही व्यावसायिक येऊन मकरसंक्रांत सिजन म्हणून घरगुती साहित्य यात कुलर, मिक्सर, फंखा, अलमारी, खुर्च्या व अन्य वस्तू दुप्पट दराने उधारी विक्री करून त्या वस्तूचे बिल न देता आदिवासी बांधवांचे सरसकट लुट करीत आहेत.
ह्या वस्तू चे कोणत्याही प्रकारचे ग्यारंठी कार्ड न देता उधारी विक्री करून 4-5 महिन्यात आपले रक्कम वसूल करून निघून जात आहेत.ती वस्तू काही दिवसांनी बिनकामी होताना दिसत आहेत.यात परराज्यातील व्यापारी मालामाल होतात मात्र वस्तू खरेदी करणारे बांधवांचे यात अति नुकसान होत आहे.