विदर्भ राज्य आंदोलन समितिच्या जिल्हा संघटकपदी राजु पिंपळकर तर मंगेश रासेकर यांची जिल्हा सरचिटनिसपदी नियुक्ती

0
127

 

वणी : परशुराम पोटे

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भभर संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. या अनुषंगाने विश्राम गृह वणी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते राजू पिंपळकर यांची ऍड.वामनराव चटप यांच्या हस्ते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हा संघटक पदी तर मंगेश रासेकर यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब राजूरकर,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक अध्यक्ष राहुल खारकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर,शेतकरी नेते देवराव धांडे,दशरथ पाटील,रुद्रा कुचनकर, आकाश सूर,राहुल खिरटकर,शैलेश गुंजेकर,नारायण काकडे,राहुल झट्टे,होमदेव कन्नके,प्रीतम मत्ते,मंगेश डोंगे,आनंदराव पानघाटे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.