डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा अनुसूचित काँग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

150

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेलच्या आदेशानुसार
14 एप्रिल रोजी सकाळी 11 :00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
याकार्यक्रमाचे उदघाटन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भीमवंदना घेण्यात आली यानंतर केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी रितेश (रामू )तिवारी शहर जिल्हाध्यक्ष, दिनेश दादा चोखारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, रोशन पचारे जिल्हाध्यक्ष किसान सेल,सोहेल शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल,सुनील पाटील, नंदू नागरकर,कुणाल रामटेके, प्रशांत भारती,घुग्घुस अध्यक्ष राजूरेड्डी, सौ. अश्विनी खोब्रागडे,सौ. अनुताई दहेगावकर, सुरज बहुराशी, सैय्यद अनवर,सौ. नेहा मेश्राम,कादर शेख,प्रीतम अट्टेला आदी उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे आयोजन पवन आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांनी केले आहे.