पिपरीत कोरोना लसीकरणाला सुरुवात माजी सरपंच पारस पिंपळकर यांच्या पाठपुराव्याला यश

150

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पिपरीत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांनी केली होती. यासंदर्भातील निवेदन त्यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते. याची दखल घेत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा आरोग्य अधिका-यांना सूचना केल्या. त्या निवेदनाची दखल घेत पिपरी येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १५) लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले.
कोरोना लसीकरणाची अडचण लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांनी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घुग्घुस येथून लसीकरणासाठी नेले होते. गावातील जवळपास तीनशे जणांचे त्यांनी लसीकरण करून घेतले होते. आता दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. राज्य शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्रच नाही. त्यामुळे घुग्घुस जाऊनच लसीकरण करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आरोग्य अधिकाèयांना सूचना केल्या. त्याची दखल घेत गुरुवारी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सरपंच वैशाली माथने, माजी सरपंच पारस qपपळकर, उपसरपंच हरिओम पोटवडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवारी, भूवन चिने, चंदू माथने, रंगराव पवार, डॉ. प्रिया पोले, कानटेकर, कावळे, ज्योती वाकुलकर, सारिता निब्रड, माधुरी कंडे यांची उपस्थिती होती.
पिपरी येथे आता लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यामुळे आता या गावातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी घुग्घुस जावे लागणार नाही. गावातच लसीकरण होईल. सोबतच पिपरी धानोरा, सिदुर, मारडा या गावांतील नागरिकांना या लसीकरण केंद्राचा लाभ घेता येईल असे पारस पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य, पिपरी यांनी म्हटले आहे.