जनतेने लसीकरणास प्रतिसाद द्यावा- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील         -हर्षवर्धन पाटील यांनी घेतली लस 

52

 

नीरा नरसिंहपूर दिनांक 15: प्रतिनिधी:-

बाळासाहेब सुतार.  

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.15) सकाळी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस घेतली. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यानी लसीकरणानंतर लस घ्यायला आलेल्या नागरिकांशी संवादही साधला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले ,’ सर्व 45 वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे. सरकारने ठरवलेल्या नियमावलीनुसार लसीकरणाला जनतेने प्रतिसाद द्यावा. कोरोना लस सर्वत्र उपलब्ध आहे. मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता, गैरसमज न करता कोरोना लस घेणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो कि,  सर्वांनी  लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा’.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. अविनाश पानबुडे, गोरख शिंदे, सागर गानबोटे उपस्थित होते.

________________________________

फोटो :-माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी सकाळी इंदापूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160