वणीत प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखावर धाड, ४ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त, डि.बी पथकाची कारवाई

69

 

वणी : परशुराम पोटे

लॉकडाऊनच्या आड किराणा दुकाणातुन छुप्या मार्गाने प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू व सुपारीची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होत असल्याची कुनकुन सुरु होतीच, दरम्यान बुधवारी रात्री ८ वाजताचे सुमारास सुगंधित तंबाकू व सुपारी दिपक चौपाटी परीसरातील भाग्यशाली नगर येथे मोठ्याप्रमाणात येत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळताच भाग्यशाली नगर मध्ये धाड टाकुन प्रतिबंधीत सुगंधित तंबाकू व सुपारी आणि वाहतुकी करीता वापरलेले वाहनासह एकूण ४ लाख ३९ हजार ६० रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन, एका आरोपीला ताब्यात घेतले. हि धडाकेबाज कारवाई बुधवारी रात्री ८ वाजताचे दरम्यान डि.बी.पथकाने केली आहे.
सविस्तर असे की,बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी वणी पोलीसांना खबरे वरून खबर मिळाली की,पाटणबोरी येथुन दिपक चौपाटी परिसरातील भाग्यशाली नगर वणी येथे प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू व सुपारी ची छुप्या पद्धतीने वाहतूक होणार आहे. अशा माहिती वरुन डि.बी पथकाने भाग्यशाली नगर येथे जावुन सापळा रचुन रेड केला असता. पांढरे रंगाचे सॅन्ट्रो वाहन एम.एच-२९ एल-२६३ ने राजेश पाडुरंग मारगमवार रा.भाग्यशाली नगर वणी हा विक्रीसाठी प्रतिबंधित जर्दा,माजाची किराणा दुकाणातुन विक्री करणे कामी घेवुन जाणे करीता वाहतूक करतांना मिळून आला. सदर वाहनाचे डिक्की व मधल्या सिटची पाहणी केली असता एका पांढऱ्या रंगाचे गोणीत एकुण १०० नग मजा १०८ हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेले २०० ग्रम वजन असलेल झेन टोबँको प्रा.लि. कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे डब्ये किंमत प्रती डब्बा ७५५ रुपये ,किंमत ७५‌ हजार ५०० रुपये, ईगल हुक्का शिशा तंबाखु पॉकीट झेन टोबॅको कंपनीचा प्रतिबंधित तंबाखू चे ४०० ग्राम वजनाचे ९० पॉकीट प्रत्येकी पॉकीट किं ५४० रुपये प्रमाणे कि. ४८ हजार ६०० रुपये, बाबु गोल्ड टोबँको ६६६ विचींग ५०० ग्रॅम वजनाचे ७२ नग प्रत्येकी पाकीट किं. ३०० रुपये प्रमाणे २१ हजार ६०० रुपये, ईगल हुक्का शिशा झेन टोबँको कंपनीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखुचे २०० ग्रॅम वजनाचे ६८ पैकीट प्रत्येकी पॉकेट किंमत २७० प्रमाणे १८ हजार ३६० रुपये, चारमीनार गोल्ड सुपारी दोन थैल्या मध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाचे १०० नग पॉकीट प्रत्येकी पॉकीट किं.२५० प्रमाणे एकुण किं.अं.२५ हजार असा एकूण १ लाख ८९ हजार ६० रुपयेचा तंबाकुू व सुपारी सह माल व वाहतुकी करीता उपयोगात आणलेली सॅन्ट्रो कंपनीचे वाहन क्र.एम.एच- २९ एल -२६३ किं.अं.२ लाख ५० हजार असा एकूण ४ लाख ३९ हजार ६० रुपयेचा मुद्देमाल मिळून आला. वरिल नमुद मुद्देमाल हा राजु येटलावार रा.पाटणबोरी यांचे जवळुन आणला असल्याचे सांगितले. सदर आरोपीताने कोव्हीड-१९ आजारास कारणीभूत असे कृत्य केले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे.त्यामुळे आरोपी राजेश पांडुरंग मारगमवार (४४) व्यवसाय किराणा दुकान भाग्यशाली नगर वणी व त्याचेसोबत अधिक एक यांचे कृत्य कलम १८८, २६९,२७० २७९, २७२, २७३, भा.दंवि सह २, ३ साथ रोग अधिनियम होत असल्याने गुन्हा नोंद करून तपासात घेतला, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा.दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुज्जलवार उप वि.पो.अ. वणी यांचे मार्गदर्शनात पोनि/ वैभव जाधव, सपोनि/ माया चाटसे, डी.बि. पथकाचे सफौ/डोमाजी भादीकर पोहवा / सुदर्शन वानोळे, पोना/ सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पोका/पंकज उंबरकर, दिपक वांइसवार यांनी केली.