स्वप्नील बोरकर यांचे “जीव गुंतले” हे मराठी गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

747

 

हर्षे साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

गडचिरोली :- जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा गायक, लेखक गीतकार स्वप्नील बोरकर यांच्या ´ जीव गुंतले ` या 18 एप्रिल ला येणाऱ्या गाण्याच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच पार पडले.

कला क्षेत्रातील उदयोन्मुख युवा गायक स्वप्नील बोरकर हा वयाच्या 16 व्या वर्षांपासून गायन करत असून सर्वसामान्य घरातून त्याने असंख्य मनाला ऐकण्यास भाग पाडणारे गाणे त्याने गायले आहे. नुकत्याच त्याच्या ´जीव गुंतले` या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून प्रेक्षकांना नवीन गान ऐकण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच येत्या 18 एप्रिल 2021 ला ‘SB MUSIC OFFICIAL’ या YOUTUBE चॅनल वर ´जीव गुंतले` हे गान प्रसारित होणार आहे. गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात गायनकलेचे कुठलेही अनुभव नसताना या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करून ध्येय साध्य करण्याच्या मार्गांवर स्वप्नील मेहनत घेत आहे. घरच्या परिस्थितीकडे बघून स्वबळावर आज इथवर प्रवास केला आहे आणि समोरही असाच प्रवास सुरु ठेवून अनेक युवकांना चालना देण्याचे धाडसही तो करत आहे. येत्या काळात गायन आणि संगीतकलेला अनेक व्यासपीठ मिळावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.