बहुजन समाज पार्टी च्या माजी जिल्हा महासचिवा वर फसवणुकी चा गुन्हा दाखल

512

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

नुकत्याच कळलेल्या माहिती नुसार बहुजन समाज पार्टी चंद्रपूर चे नेते व माजी जिल्हा महासचिव घुग्घुस येथील भीमेन्द्र कांबळे यांच्यावर त्यांचे सख्खे भाऊ आणि आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मयत हरिशचंद्र पुंडलिक कांबळे ह्यांची व त्यांचे व्यावसायिक भागीदार फिर्यादी कृष्णकांत वर्मा ह्यांच्या मालकीची व मयताच्या नावावर रजिष्ट्री विक्रीपत्र असलेली मौजा सावंगी मेघे , त. जी. वर्धा मौजा क्रमांक 202/1 , प्लॉट क्रमांक 36/1, आराजी 139.50 हा प्लॉट त्यांच्या मृत्यू पश्चात आरोपी भीमेन्द्र कांबळे व सहआरोपी महेंद्र भगत तथा त्यांच्या परिवारातील लोकांनी मिळून दुय्यम निबंधक वर्धा यांचे सोबत संगनमत करून मृतकाचे छायाचित्र विक्री पत्रावर लावून मृतकाच्या ऐवजी तोतया व्यक्तीला रजिष्ट्री च्या वेळी हजर करून त्याचा अंगठा निशाणी विक्रीपत्रावर घेऊन खोटा दस्तऐवज तयार केला व सदर प्लॉट ची विक्री सौ. संगिता सिद्धार्थ कोसमकर रा. सावंगी मेघे त. जी. वर्धा यांना दिनांक18 जानेवारी 2019 रोजी परस्पर केली.
वरील कारणास्तव फिर्यादी कृष्णकांत गयाप्रसाद वर्मा रा. शालीकराम नगर ,घुग्घुस यांच्या तक्रारी नुसार आरोपी भीमेन्द्र कांबळे व महेंद्र भगत यांचेवर भारतीय दंड विधान कलम 419, 420, 465, 468, 471 व 34 नुसार पोलीस स्टेशन सावंगी मेघे त. जी. वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भीमेन्द्र कांबळे अटक करण्यात आली आहे मात्र दुसरा आरोपी महेंद्र भगत मात्र फरार असून त्याला अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दुसऱ्या आरोपीस अटक करण्यात सावंगी मेघे पोलीस हयगय करीत असून त्यास वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा फिर्यादीने आरोप केला आहे.
सदर प्रकरणातील विक्रीपत्र केलेल्या प्लॉट चे आममुखत्यारपत्र मयत हरीशचंद्र कांबळे यांनी दि . 5 जानेवारी 2019 रोजी केलेले असून ते सुद्धा खोटे व बोगस असण्याची दाट शक्यता फिर्यादी ने व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन सावंगी मेघे चे सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून आरोपी कांबळे यास 5 दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयाने दिली असल्याचे फिर्यादी कडून कळले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वर्धा पोलीस च्या वरिष्ठ प्रशासनाने करावी व यातील दुसऱ्या आरोपींना अटक करून मला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी फिर्यादीने केली आहे.