वैरागड येथे माळी समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन.

115

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड ;.- येथील माळी समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती शासनाच्या निर्बधाचे पालन करीत साजरी करण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संसदपटू, लेखक, संपादक, शोषित, पीडितांचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी वैरागड गावात मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. परंतु कोरोनाचे सावट असल्याने येथील माळी समाजात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विजय गुरनुले सर, माजी ग्राम पंचायत सदस्य संजय खंडारकर, एकनाथ गोटेफोडे, चंद्रकांत गोटेफोडे आणि विकास बनकर उपस्तीत होते.