देऊळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी केले रक्तदान निःशुल्क रक्तसेवा समिती देऊळगाव व गडचिरोली द्वारा उपक्रम

64

 

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

देऊळगाव :- निशुल्क रक्त सेवा समिती देऊळगाव व जिल्हा निशुल्क रक्त सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने, देऊळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 13 एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
रक्तदात्यां मध्ये अजय सहारे, लखन नारनवरे , चेतन नारदेलवार , हितेश चंदनखेडे, शुभम पाथर, हर्षल कडीखाये , रश्मी सालोडकर , लखन ननावरे , चेतन कामतकर, गुणवंत कथले , संकेत गुद्देवार , नंदकिशोर खोबरागडे, विकास नागापुरे, नंदकिशोर नन्नावरे , सौरभ चव्हाण , हर्षल खोबरागडे , मृगल कुमरे, दिलीप कामतकर, विकास चंदनखेडे , भूषण कांबळे, गौतम गेडाम , धीरज घाडगे, यांचा समावेश होता.
या रक्तदान शिबिरात देऊळगाव येथील सर्व सामाजिक चळवळीत काम करणारे, सुजाण नागरिक आवर्जून उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चारुदत्त राऊत, निशिकांत गेडाम , दर्शन चंदनखेडे, भास्कर रोहणकर, लतीफ बनसोड , नंदकिशोर कांदुर, सचिन कोहळे , सारंग कुरुटकर, व इतर गावकरी मंडळी , जिल्हा स्वयं रक्तदाता समिती, आणि सामाजिक सहकारी यांनी सहकार्य केले.