श्री प्रकाश किसनराव घाटे माजी गटशिक्षणाधिकारी दर्यापूर यांचे दुःखद निधन

74

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
मागील दोन वर्षापूर्वी शिक्षण विभागातून प्गटशिक्षणाधिकारी या पदावरून निवृत्त झालेले दर्यापुर तालुक्यातील पिंपळोद येथील रहिवासी असलेले प्रकाश किसनराव घाटे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी दुःखद निधन झाले.त्यांचे वय 60 वर्ष होते त्यांच्या पश्चात त्यांचे सेवानिवृत्त शिक्षक वडील असून एक मुलगा व एक मुलगी तसेच शिक्षिका पत्नी प्रभा झासकर असा आप्त परिवार आहे. दर्यापूर येथील आशा मनीषा मंदिराच्या समोरील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यविधी संपन्न झाला अंत्यविधीला बरेचसे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अशाअचानक जाण्याने शिक्षक वर्गात व शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे.
त्यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दर्यापुर च्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.