साखरी जि प पुर्व माध्यमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

83

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दिनांक 14/4/2021 ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा साखरी पंचायत समिती अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मायाताई शिरसाट यांनी पुष्पमाला व दिपप्रज्वलीत केली. त्यानंतर जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण सुद्धा करण्यात आले तसेच या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मायाबाई शिरसाट शाळेचे मुख्याध्यापक विनीत पारडे सहाय्यक शिक्षक विजय मकेश्वर व सहायक शिक्षिका रेखाताई अभ्यंकर तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी उपस्थित होते.