नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला दवाखाना नागरिकांसाठी हक्काचा “आधार” – माजी खासदार शिवाजीराव आढळराव

43

 

पुणे : कै.दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट आणि सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व नगरसेवक भानगीरे यांच्या पुढाकाराने काळे बोराटे नगरमध्ये अवघ्या 10 रुपयांत आरोग्य तपासणी आणि अल्प दरात वैद्यकीय सुविधा देणाऱ्या सेवाभावी सामाजिक दवाखान्याचा शुभारंभ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोनाच्या संकटात प्रभागातील नागरिकांकरिता नगरसेवक नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला हा सेवाभावी दवाखाना नागरिकांचा आधार ठरेल अशी मला खात्री आहे, मागील 15 वर्षांपासून नगरसेवक भानगिरे हे समाजासाठी झोकून काम करत आहेत. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार समोर ठेवून समाजाकरिता काम करणारा शिवसैनिक नाना भानगिरे यांच्या रूपाने या भागात काम करत आहे याचा अभिमान वाटतो. हडपसरला जम्बो कोव्हिडड सेंटर सूरु होण्यासाठी
शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या रुग्णालय स्थापनेसाठी पुढाकार घेतलेले डॉ प्रियांका कोतवाल, डॉ रोहित बोरकर, डॉ शरद कारंडे, डॉ नम्रता शिंदे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, इंतु शेख, योगेश सातव, प्रवीण हिलगे, संतोष जाधव ,नाना बारगुळे , पप्पू होले, विशाल वाल्हेकर, लहू शिंदे, विक्रम फुकटे, राणी फरांदे ,बबनराव आंधळे, अण्णा धायांगुडे, अभिजीत बाबर, प्रभाग 26 चे शिवसैनिक आणि नाना भानगिरे टीम परिश्रम घेत आहे.