शिवसेना एटापल्ली तर्फे आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

84

 

प्रतिनिधी // तेजल झाडे
शिवसेना तालुका एटापल्ली तर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त एटापल्ली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरं शिबीरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिरात शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांची प्रमुख उपस्थीती होती व स्टेट बँकेचे व्यवस्थापक मनीष मौर्य,इंडियन गॅस एजेन्सी चे सर्वेसर्वा अमित वासनिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात मनीष मौर्य,अमित वासनिक,राहुल ढबाले,सचिन मोतकुरवार,सुरज जक्कुलवार,किशोर मुल्लेटी,राहुल मेश्राम,रोशन निलीवार,उमेश चिट्टीवार,अंकिता खोब्रागडे,स्नेहा आत्राम,आदित्य चिप्पावार,महेंद्र सुल्वावार,नाजील देवतळे,अरबाज खान,अनिकेत रामटेके,प्रशिक करमरकर,मोहित सेलोटे,जगदीश कांबळे,किशोर मट्टामी,संपत पैडाकुलवार,अनिकेत मामीडवार,रोहित बोमकंटीवार,ओमकार मोहूर्ले,राघव सुल्वावार आदींनी रक्तदान केले.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील संघर्ष आणि लढा या बॅनर चा माध्यमातून जनतेपर्यंत त्यांचे कार्य मांडण्यात आले. सदर बॅनर मुख्य रस्त्यावरून फिरताना जनतेचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष दुर्गे शिवसेना शहर तालुका प्रमुख राघव सुल्वावार युवा नेते शिवसेना,छोटू करमरकर,प्रवीण मेश्राम,बादल चुनरकर,अनिकेत रामटेके,संकेत फुलमाळी, नाजील देवतळे,गुणवंत कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.