Home आर्थिक मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थानी घेतली शेतकर्याची कार्यशाळा, शासनाच्या विविध योजनांची दिली...

मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थानी घेतली शेतकर्याची कार्यशाळा, शासनाच्या विविध योजनांची दिली माहीती

335

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

भारत हा कृषी प्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. कृषी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि धोरणे महाराष्ट्र शासन पातळीवर राबविली जात आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.
अनेक शेतकर्‍यांना त्या योजनांची माहितीच नसते त्या अनुषंगाने मारेगाव येथिल मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम रमेश पिंपळकर यांनी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेची खडानखडा माहिती देण्याचे काम हाती घेतले आहेत.
मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येतील शेतकऱ्यांना एकत्रित करून योजनेचे महत्व योजनेची पार्श्वभूमी योजनेची नोंदणी कुठे करायची त्यामागे काय तरतुदी असतात योजने मार्फत मदत कुठल्या प्रकारे मिळत असते,याची संपूर्ण सखोल माहिती विद्यार्थ्यांनी तळघरात पोचून शेतकऱ्यांना दिली.यावेळी शेतकर्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना संदर्भातील माहिती पत्रक देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य आर.ए.ठाकरे उपप्राचार्य एम.व्ही.कडू प्राध्यापक सी.आर ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गावातील सरपंच सौ.गीता सुधाकर धांडे, उपसरपंच जनार्दन गाडगे, पोलीस पाटील दिपक ढवस,बाळा बरडे,कवडु माथनकर,तुकाराम ढेगंळे,गुलाब बरडे ,रोशन शिदे ,पाटिल गणेश नगराळे ,हनुमान बरडे उपसरपंच शेतकरी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleगोष्ट मेंढा गावाची ! लढाई भ्रष्टचारांशी
Next articleयुवक कांग्रेस तर्फे वृक्षा रोपण