शिवसेना तालुका एटापल्ली तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांची उपस्थिती

64

 

सदाशिव माकडे (८२७५२२८०२०)

ऐटापल्ली :– दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त आज ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य रक्तदान शिबिरा मध्ये मनीष मौर्य, अमित वासनिक, राहुल ढबाले, सचिन मोतकुरवार, सुरज जक्कुलवार, किशोर मुल्लेटी, राहुल मेश्राम, रोशन निलीवार, उमेश चिट्टीवार, अंकिता खोब्रागडे, स्नेहा आत्राम, आदित्य चिप्पावार, महेंद्र सुल्वावार, नाजील देवतळे, अरबाज खान, अनिकेत रामटेके, प्रशिक करमरकर, मोहित सेलोटे, जगदीश कांबळे, किशोर मट्टामी, संपत पैडाकुलवार, अनिकेत मामीडवार, रोहित बोमकंटीवार, ओमकार मोहूर्ले, राघव सुल्वावार आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील संघर्ष आणि लढा बॅनर च्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरून जात असलेल्या जनतेने लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख शहर, राघव सुल्वावार युवा नेते शिवसेना, मनीष मौर्य बँक व्यवस्थापक स्टेट बँक एटापल्ली, अमित वासनिक इंडियन गॅस एजेन्सी एटापल्ली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.