हिवरखेड येथे वादळीवाऱ्यासह दमदार मुसळधार पावसाने लावली हजेरी नुकसान धारकांना शासनाने मदत करावी,

37

 

अकोट प्रतिनिधी

हिवरखेड येथे १४ एप्रिलच्या दुपारी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली, या अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक रहिवाशांचे नुकसान केले आहेत.बऱ्याच नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली तर पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान काढले, पिकामध्ये गहु, सत्रा , केळी, पपई, टरबूज, खरबूज, आधी पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेत पाडले आहे, आधीच कोरोना वरून लॉकडाऊन व त्यात अचानक पावसाने पुन्हा संकट निर्माण केले, अशा बिकट परिस्थितीत कसा जगणार शेतकरी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, त्याची हिंमत शासनाने विम्याचे कवच देऊन वाढवावी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.