बौद्ध समाज कोंढाळातर्फे डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती साजरी – कोरोनामुळे आनंदावर पडले विरजण

123

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व शासनाच्या निर्देशाचे पालन करता अगदी साध्या पद्धतीने बौद्ध समाज कोंढाळातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढून भीमगिते,विविध स्पर्धा आयोजित करून जयंती साजरी करण्यात येत असे.मात्र कोरोनामुळे बौद्ध उपासक,उपसिका यांच्या आनंदावर विरजण पडले.त्यामुळेच अगदी साध्या पद्धतीने ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत कोंढाळाचे सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनी डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण,मेणबत्ती लावून जयंती साजरी करण्यात आली.ध्वजारोहण गोवर्धन शेंडे यांनी केले.
जयंती साजरी करतेवेळी शारीरिक अंतर ठेवून कोरोनाचे नियम पाळून बौद्ध समाज अध्यक्ष शिशुपाल वालदे,सचिव गुरुदास बन्सोड,श्रावण टेंभुरने,ताराचंद मेश्राम,आम्रपाली बौध्द महिला मंडळ अध्यक्षा पुष्पा धाकडे,सचिव अंजीरा ठवरे, पोलीस पाटील किरणताई कुंभालवार,माजी सरपंचा रेवता शेंडे,ग्रामपंचायत सदस्या नलिना वालदे व बौद्ध समाजाचे उपासक, उपसिका उपस्थित होते.