शासनाने व्यापाऱ्यांना पॅकेज मध्ये समाविष्ट करुन अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यापाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे – राकेश खुराणा

70

 

विशाल ठोंबरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

कोरोनाचे संकट आणखीनच सबळ बनत चालले आहे, गेल्या काही दिवसात जणू कोरोनाचा कहरच बरसत असल्याने अखेर काही शर्ती व अटी ठेऊन महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला असून त्याकरिता 5 हजार 476 कोटींच्या पॅकेज ची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र त्या पॅकेज पासून व्यापारी, सर्वसाधारण फूटपाथवाले यांना डावलण्यात आले असून अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यापाऱ्यांना त्या पॅकेज मध्ये समाविष्ठ करून त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे असे मत व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्ष भरापासून सर्व व्यापारी मित्र कोरोनाशी सबळ पणे लढा देत आहे. काहींना त्यात आपले प्राण सुद्धा गमवावे लागले, कोरोनाची दुसरी लाट जगात भयावह असून संपूर्ण वर्ष दुखमय परिस्थितीत पार पाडावे लागत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात 15 दिवसाच्या लॉकडाऊन ची घोषणा केली आहे. या दरम्यान आर्थिक पॅकेज सुद्धा जाहीर केलं आहे, मात्र त्यापासून व्यापाऱ्यांना डावलण्यात आले असून, त्यांना विमा संरक्षण सुद्धा लागू नाही. अत्यावश्यक सेवा लक्षात घेता व्यापारी वर्गाणी यात कमालीची साथ सर्वत्र दिली आहे, व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जीवनाचा गाळा चालविण्या करिता आर्थिक सहाय्याची गरज आहे, कारण त्यांचा संपूर्ण धंदा बसला असल्याने आर्थिक बाबीची देवाण घेवाण करणे ठप्प झाले असून बँकेचे कर्जाचे हफ्ते, नौकर पगार, बिल, दुकान गाळे आदी विविध बिले व पगार यामुळे त्यांना सुद्धा कमालीची आर्थिक टंचाई निर्माण झाली असल्याने अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यापाऱ्यांना शासनाकडून विमा संरक्षण नसल्याने तात्काळ ते लागू करावे तसेच शासनाने पॅकेज मध्ये व्यापाऱ्यांना समाविष्ठ करावे अशी मागणी व्यापारी असोसिएशन वणी चे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केली आहे.