शिवानी वडेट्टीवार यांची “ति” पोस्ट झाली सोशल मीडियावर व्हायरल….

806

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

 

चंद्रपुर:- राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या, युवक काँग्रेस महाराष्ट्राच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यांचे जयंती दिनाचे दिवशी महापरिनिर्वाण दिनाची टाकलेली पोस्ट आता चर्चेचा विषय झाली असून जयंतीच्या दिवशी महापरिनिर्वाण दिनाची ची पोस्ट आल्याने आंबेडकरी जनतेतही असंतोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून जनतेतून टिप्पणी केली जात आहे….