सी. आर. पी.एफ. 113 बटालियन ने साजरी केली अम्बेडकर जयंती

114

धानोरा /भाविकदास करमनकर

113 बटालियन सी. आर. पी. एफ. मुख्यालय धनोरा इथे दिनांक 14 एप्रिल 2021 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाज सेवक, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर यांची 130 वी जयंती मोठ्या उत्साहने साजरी करण्यात आली. या प्रसंगी 113 बटालियन चे कमांडेंट श्री जी. डी. पंढरीनाथ यानी डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुण व मोमबत्ती प्रज्वलित करुण मानवंदना वाहिली. या कार्यक्रमात बोलतानी कमांडेंट श्री जी. डी. पंढरीनाथ यांनी डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर यांच्या जीवना विषयी व त्यांनी आपल्या देशाकरिता केलेल्या कार्या बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात उपस्थित 113 बटालियन चे द्वितीय कमान अधिकारी श्री राजपाल सिंह, उप कमांडेंट श्री ए. के. अनस , श्री प्रमोद सिरसाठ, सहायक कमांडेंट रोहतास कुमार व 113 बटालियनच्या सर्व जवानानी डॉ भीमराव रामजी अम्बेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला/पुष्प अर्पण करुण अभिवादन केले.