लाखो रुपयांच्या साठवणूक बंधाऱ्याची ग्रामपंचायतीकडे सत्यप्रतच उपलब्ध नाही – माहिती अधिकारात प्रकरण उघडकीस

259

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपयांचा बांधकाम झालेल्या पाणी साठवणूक बंधाऱ्याच्या कागदपत्रांची सत्यप्रतच ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकार अर्जाद्वारे उघडकीस आली आहे.
कोंढाळा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार सत्यवान रामटेके यांनी वित्तीय वर्ष २०२०-२१ कालावधीतील ग्रामपंचायत यंत्रणा असलेल्या पाणी साठवणूक बंधाऱ्याची माहिती अधिकार अर्जाद्वारे १९ मार्च २०२१ रोजी जि.प.सिंचाई उपविभाग देसाईगंज यांना माहिती मागितली होती.सिंचाई विभागाने यंत्रणा असलेल्या कोंढाळा ग्रामपंचायतीस ३१ मार्च २०२१ रोजी माहिती देण्यासंदर्भात पत्र पाठवून प्रतिलिपी सत्यवान रामटेके यांना देण्यात आली.
माहिती देण्यासंदर्भात प्रतिलीपी देताच ग्रामपंचायत कार्यालय कोंढाळा येथे सत्यवान रामटेके ८ एप्रिल २०२१ रोजी माहिती अधिकार अर्जाची माहिती विचारणा केली असता ग्रामपंचायत कार्यालय येथे एकही कागदपत्रांची सत्यप्रत कार्यालयात उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायत सचिव मडावी यांनी सांगितले व तसे पत्रही देण्यात आले.पत्रामध्ये साठवणूक बंधाऱ्याची सर्वच रेकार्ड कार्यकारी अभियंता जी.प.सिंचाई विभाग गडचिरोली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचा उल्लेख केला आहे.सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
पाणी साठवणूक बंधाऱ्याची अंदाजपत्रकीय किंमत १५ लक्ष रुपये एवढी आहे.काम सुरू दिनांक- १ ऑक्टोंबर २०२० रोजी व काम पूर्ण दिनांक-२५ डिसेंबर २०२० रोजी म्हणजे तीन महिने लोटूनही यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतीकडे साठवणूक बंधाऱ्याच्या कागदपत्रांची सत्यप्रत नसणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरल्या जात असावे.साठवणूक बंधाऱ्यावर किती खर्च झाला,किती मजूर कामावर होते,किती सिमेंट वापरला गेला,लोहा किती,रेती किती,गिट्टी किती याची माहितीच ग्रामपंचायत कार्यालय कोंढाळा येथे उपलब्ध नसल्याने कामावर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
काम करणारी यंत्रणा ग्रामपंचायत कोंढाळा असून सुद्धा एकही देयके,साहित्ये व मजुरांची झेरॉक्सची सत्यप्रत उपलब्ध नल्याने ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एखादा जर कां देयक ग्रामपंचायतीस मिळाला नाही तर कशाच्या आधारावर देयकाची मागणी केली जाणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.एखादा अर्ज कार्यालयास सादर केल्यानंतर त्याची प्रतिलिपी आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळते.कार्यकारी अभियंता जी.प.सिंचाई विभाग गडचिरोली यांना सादर केलेल्या साठवणूक बंधाऱ्याची बिलांची प्रतिलिपीच ग्रामपंचायत येथे उपलब्ध नसल्याने अशा भोंगळ आणि भ्रष्ट कामाविरुद्ध कोंढाळा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार सत्यवान रामटेके जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.