मुनघाटे महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

56

धानोरा /भाविकदास करमनकर

स्थानिक धानोरा येथील श्री जे एस पी एम महाविद्यालयात विष्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .प्राचार्य डॉ विना जम्बेवार यांच्या मार्गदर्शनात कोविड 19चे पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी डॉ जम्बेवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन परिचय कथन केला व डॉ आंबेडकरांनी भारताला सर्वोच्च अशी राज्यघटना दिली ज्यामुळे भारत एकसंघ आहे त्यांनी कामगारांना वेतन ,रजा, आरोग्य सुविधा,निवृत्ती वेतन इ लाभ कायद्या द्वारे मिळवून दिले महिलांना समान न्याय प्रस्थापित होण्यासाठी कायदे केले, समान न्यायाच्या तत्व सामाजिक ,आर्थिक ,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात प्रस्थापित केले ,सामाजिक विषमता विरूध्द जन्मभर लढा देऊन अनिष्ट रूढी ,परंपरांना कायद्याद्वारे हद्दपार केले त्यांच्या विद्वत्ते ने समग्र विश्वात भारताचे नाव अजरामर केले त्यांना जगात नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून सर्वत्र ओळखल्या जाते ते भारतीय होते हे आम्हास भूषणावह आहे असे मत मार्गदर्शनातून व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रा भाविकदास करमनकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भास्कर वाढनकर,बालाजी राजगडे आदींनी सहकार्य केले