पळून गेलेला कोविड रुग्ण अखेर सापडला प्रशासनाने सोडला सुटकेचा निःश्वास रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली होती

0
311

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

मारेगाव: येथील पुरके आश्रम शाळेत (आयसोलेशन) कक्षात असलेली व तिथे उपचार सुरू असलेली कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती चक्क पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार काल 29 मंगळवारी उघडकीस आला होता. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली होती.
त्याला पोलिसांनी  धामणी येथील एका शेतकऱ्यांचा गोठ्यातून आज सकाळी पकडले. त्यामुळे तालुकवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येतील स्व. चिंधुजी पुरके आश्रम शाळा येथे केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये तालुक्यातील कुंभा येथील एका चाळीस वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्याला तेथेच विलगीकरण करण्यात आले होते. काल 29 रोजी  वैद्यकीय प्रशासकीय  यंत्रणा झोपेत असताना कोविड पॉझिटिव्ह रुग्ण विलगिकरण  कक्षातून पळून गेला , रूग्णाने पळ काढल्याची माहिती मिळताच सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या पायाखालची वाळू  सरकली. याबाबतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शर्थीने प्रयत्न करीन त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. परिसरातील सर्व मंदिर, गावे सुकळी,पारवा ,कोटेश्वर व त्याचे नातेवाईक यांच्या कडे शोध घेतला असता तो सापडला नाही. धामणी येथील अचानक शेतकरी शेतात जात असताना तो शेतातल्या गोठ्यात बसून दिसल्याने शेतकऱ्याची चांगलीच दमशाक झाली. लगेच शेतकऱ्यांनी धामणीचे पोलीस पाटील भास्कर पिंपळकर यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली, माहिती कळताच पोलीस पथकासह व आरोग्य यंत्रणेने त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, शिपाई नितीन खांदवे, किशोर आडे,  वाभिटकर आदींनी केली.

कोविड रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होऊन अशा घटना घडत असल्याची चर्चा तालुक्‍यात जोर घेत आहे.