बावडा येथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

99

 

निरा नरशिंहपुर दि :13 प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार. 

बावडा येथे आकर्षक शिवस्मारक येत्या सहा महिन्यात उभारण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व दिव्य असा तब्बल 13 फूट उंचीचा व  2.5 मे.टन वजनाचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. या शिवस्मारकाचे भूमिपूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते मंगळवारी (दि.13) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

बावडा गावांमध्ये इंदापूर- अकलूज महामार्गावरती मारुती मंदिराच्या लगत होणारे हे देखणे शिवस्मारक समाजासाठी प्रेरणादायी असेल तसेच राज्यामध्ये आदर्श असेच होईल, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

या शिवस्मारकामध्ये चबुतरा, बगीच्या व इतर सुशोभीकरणाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळापुतळा निर्मितीचे काम मुंबईमध्ये अंतिम टप्प्यात आलेले आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. भूमिपूजन प्रसंगी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा, शिवप्रतिष्टान व शिवाजी तरुण मंडळ बावडा यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वधर्मीय ग्रामस्थ उपस्थित होते. या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. दरम्यान,यावेळी बावडा गावामध्ये बांधण्यात येणाऱ्या वेस चे भूमिपूजनही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वेश हे गावचे वैभव असते, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

_______________________________

फोटो:- बावडा येथे शिवस्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160