ट्रेनच्या डब्यांचा वापर रुग्णालय म्हणून करा ‘आप’ रत्नागिरी ने सुचवल्या उपाययोजना.

54

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – आप रत्नागिरीचे अंतरिम अध्यक्ष ज्योतिप्रभा पाटील कोविड परिस्थिती बाबत निदर्शनास आणून देत आहेत की येथील कोविड परिस्थिति ही हाताबाहेर गेली असून, आरोग्य सेवांवर भयानक ताण आला आहे. कोविड हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणची आरोग्य व्यवस्था ही पुर्णपणे कोलमडून गेली आहे, जसे की रुग्णांना बेड अभावी जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणची परिस्थिती इतकी वाईट आहे की, उपचारांसाठी रांगेत ताटकळत उभे असतानाच रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. मला असे कळाले आहे की, राज्य प्रशासन घरीच विलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णांसाठी खासगी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे, माझ्या मते ही सुविधा तातडीने सुरू करून अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळावेत.
तथापि, माननीय मुख्यमंत्री साहेब, अजून किती वाईट परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे अथवा अजून किती रुग्ण संख्या वाढेल याचा अंदाज आपण करू शकत नाही, जिथे कोविडचा जास्त प्रभाव आहे अशा परिस्थितीत मी त्यांना अशी सूचना करू इच्छितो की, जसे 2020 प्रमाणे अशीच परिस्थिती उद्भवली असता ट्रेनच्या डब्यांचा अतिरिक्त किंवा बॅकअप रुग्णालय महणून वापर करण्याचा विचार केला जावा. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ट्रेनच्या डब्यांचा वापर वैद्यकीय देखरेखीखाली हलक्या किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होऊ शकतो, त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णालय रिकामे ठेवू शकतो. अशी अपेक्षा आहे की ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी पुढील कृती योजना ठरवताना वर नमूद केलेल्या उपायाचा गांभीर्याने विचार केला जावा.
मी तुम्हाला विनंती करतो की हॉटस्पॉट(सध्याचे व भाकीत केलेले) असलेल्या ठिकाणच्या जिल्हा दंडाधिकारी तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यानी सर्व रुग्णालयांचे ऑडिट करून रुग्णालयातील बेड रिकामे करण्या करता वर नमूद केलल्या उपायांची आवश्यकता जाणून घेऊन रेल्वे विभागाला तसा प्रस्ताव द्यावा. त्याशिवाय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माझा असा विश्वास आहे की, प्रत्येक संकट आपल्याला एक संधी आणि धडा घेतो, भारतातील आरोग्यसेवेची नोंद घेताना, माझा असा विश्वास आहे की, ग्रामीण भागांना वैद्यकीय सेवा पुरवणारा प्रकल्प होऊ शकेल व ग्रामीण आरोग्य सेवेच्या यशाची कहाणी म्हणून रूपांतरित होईल.
मला आशा आहे की हे पत्र सध्या आपल्यासमोरील संकटे सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. असे ज्योतीप्रभा पाटील अंतरिम अध्यक्ष, आम आदमी पक्ष, रत्नागिरी. यांनी म्हटले आहे.

*दखल न्यूज भारत.*