विनोद मिरगल यांच्या विशेष प्रयत्नाने झालेल्या भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याचे कामा मुळे ग्रामस्थांनी मानले मिरगल यांचे आभार भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

52

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावातील तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विनोद मिरगल यांच्या अथक प्रयत्नाने भालेकरवाडी ते धाकोंडी या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे त्यांनी ही कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार सरपंच विकास बेटकर आणि उपसरपंच पांडुरंग भोजने यांनी काढले.भालेकरवाडी ते धाकोंडी एक कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच विकास बेटकर आणि पांडुरंग भोजने यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उद्योजक चंद्रकांत भोजने यांनी कोविड निर्बंधामुळे उपस्थित राहता येऊ न शकल्याने सदरच्या कामाला शुभेच्छा पाठवताना या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.विकासासाठी आपण सदैव गावच्या सोबत असल्याचे देखील त्यानी सांगितले.
महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट संगमेश्वर शाखा मुंबईचे कार्याध्यक्ष जी.झे.टोपरे यांनी स्वखर्चातुन रस्त्यासाठी योगदान दिले. तर दत्ताराम भालेकर, बाबुराव भालेकर यांनी या कामासाठी अथक परिश्रम घेतले.यावेळी पूजा भालेकर, लक्ष्मी खताते, सुलोचना गवळी, गंगाराम झिमाजी टोपरे ,बारक्या भालेकर, संतोष भालेकर, विजय भालेकर, गोविंद गवळी, विजय महाडीक, गोपाळ महाडीक, शरवरी महाडीक, रघुनाथ महाडीक, प्रकाश भालेकर, दत्ताराम भालेकर ,सिताराम भालेकर, रमेश मिरगल, जयवंत मिरगल, शांताराम तटकरे, नंदू भालेकर, चंदू भालेकर , श्रीराम भालेकर, कृष्णा महाडीक,यशवंत महाडीक ,वसंत महाडीक, बबन भालेकर, लक्ष्मी भालेकर, गोपाळ मिरगल, रमेश कांबळे, बाळाराम खेडेकर, विष्णू भोजने, आदी जमीन मालकांचा सन्मान करण्यात आला. प्रभाकर भोजने, पांडुरंग भालेकर ,शांताराम कांबळे, पांडुरंग तटकरे आणि वाडीतील समाजबांधवांचे याकामासाठी सहकार्य लाभले.गावच्या रस्ते विकासात सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींना अशा रस्त्यांचा वापर करून दयायला नको आणि स्मशान भूमीत देखील सहकार्य ठेवता कामा नये अशाप्रकारची नाराजीची चर्चा देखील यावेळी ऐकण्यास मिळत होती.

फोटो कॅप्शन : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी भालेकरवाडी ते धाकोंडी या रस्त्याचे भूमिपूजन करताना विकास बेटकर,पांडुरंग भोजने,विनोद मिरगल,जी.झे.टोपरे,दत्ताराम भालेकर,बाबुराव भालेकर आदी

*दखल न्यूज भारत.*