मंगीगुडम येथील ग्रामस्थांशी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी साधलंय चक्क माडिया भाषेतच संवाद मंगीगुडम येथील ग्रामस्थांनी मानले जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे आभार

41

 

झिंगाणूर….झिंगाणूर पासून दोन कि.मी.अंतरावरील मंगीगुडम येथील नाल्यावर जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या पाठपुराव्याने पूल बांधकामासाठी आवश्यक निधी झाल्याने या पुलाचे भूमीपूजन सोहळा नुकताच गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.

पुलाचे भूमीपूजनानंतर जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी एक कि.मी.पायी जाऊन मंगीगुडम येथील आदिवासी ग्रामस्थांसोबत चक्क माडिया भाषेत संवाद साधून त्यांची समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या.

अनेक वर्षांपासून मंगीगुडम नाल्यावर पक्के पुलाची असलेल्या ग्रामस्थांनी पुलाचे भूमीपूजनानंतर आनंदात भारावून जाऊन जि.प.अध्यक्षांसामोर माडिया भाषेतच समस्यांचा पाढाच वाचले.मंगीगुडम येथील आदिवासी बांधवांनी माडिया भाषेत मुख्यतः रस्ते,पिण्याची पाण्याची सुविधा,आरोग्य व विजेचे समस्या मांडले.यावर आदिवासी ग्रामस्थांना जि.अध्यक्ष कंकडालवार यांनी माडिया भाषेतुनच उत्तर देत प्राधान्यक्रमाने समस्या सोडवून देण्याचे ग्वाही दिले.

पावसाळ्यात प्रत्यक्ष गावात येऊन नाल्यावर पूल बांधकामाचे आश्वासन देऊन दोन महिन्यातच पुलाचे भूमिपूजन करून आश्वासन पूर्ती केल्याबद्दल जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समस्त आदिवासी ग्रामस्थांनी माडिया भाषेतूनच आभार मानले.

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त मंगीगुडम येथील आदिवासी ग्रामस्थांशी संवाद साधतांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत जि.प.चे माजी सभापती व जि.प.सदस्या जयसुधा जनगाम, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, झिंगणूर चे सरपंच नीलिमा कारे,उपसरपंच शेखर गन्नारपू,आविस सल्लागार रवी सल्लम,माजी सरपंच कारे मडावी,पत्रकार रामचंद्रम कुमरी, बामणीचे सरपंच अजय आत्राम,सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे,मदाराम चे माजी सरपंच इरफा मडावी,गरकापेठाचे उपसरपंच दासरी वेंकटी,दुर्गेश लंबाडी, सडवली जनगम,शंकर मडावी,समय्या कोंडागोरला,कोपेलाचे सरपंच सुरेश जनगम, कोरलाचे सरपंच गणपत वेलादी, लक्ष्मण कुळमेथे, धर्मय्या गावडे,बाबुराव कुमरी,रामा आत्राम,भीमराव कूळमेथे,पोरीय मडावी,सुरेश कुमरी, सिनू कुमरी, गणेश मडावी, शैलेश मडावी,फकिरा मडावी,साई मंदा, किरण वेमुला,प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक,वेंकटस्वामी रामटेके,रोहन अल्लूरी,संतोष दुर्गम आदी उपस्तीत होते.