हिंगणघाट येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांन तर्फे वृक्षारोपण,ध्वजारोहण व सामूहिक प्रार्थनातंर्गत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा…..

0
183

सैयद जाकिर
उपजिल्हा प्रतिनिधी….
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,जिल्हा संपर्कप्रमुख माजी खासदार अनंतराव गुडे यांच्या निर्देशानुसार शिवसेना उपनेते माजी राज्य मंत्री श्री. अशोकभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा चौक येथील शिवसेना कार्यालयावर भगवा ध्वज फड़कविण्यात आला.यानंतर दुर्गा माता मंदिरात मुख्यमंत्र्यांना उद्दंड आयुष्य लाभावे याबाबत व भविष्यातील त्यांच्या यशस्वी वाटचाली करिता पूजा व प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर बस स्थानक परिसरामध्ये आगारप्रमुख नेवारे,स्थानक प्रमुख मसराम,वाहतूक नियंत्रक शेडमाके व कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
देशात व राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार पर्यावरण पूरक व साध्या पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले.
झाडे लावण्यासाठी श्री. मुंडे,देवगिरकर,तेजस मेडिकल, ढोमने ज्वेलर्स यांनी ट्रीगार्ड देऊन सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे,तालुका प्रमुख भोला चौहान शहर प्रमुख सतीश ढोमणे,नगरसेवक श्रीधर कोटकर,अमोल गायकवाड,पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश अनासने,पत्रकार अब्बास खान ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुधाताई शिंदे,करुणा वाटकर,नलिनी सयाम, माधुरी खडसे,लता गंथाडे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.