सासऱ्याने केला सुनेचा खुन काळजाचा थरकाप उडविनारी घटना

227

 

हर्षे साखरे विभागीय प्रतिनिधी

पोंभुर्णा:- सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोंभुर्णा तालूक्यातील चेक नवेगाव येथे दि. 12/04/2021 ला सांयकाळच्या सुमारास घरगुती वादातुन सासऱ्याने सुनेचा खुन केल्याची थरारक घटना घडली असून मृत महिलेचे नाव गीता कन्नाके वय ( अंदाजे 28) वर्ष आहे.

मृत महिलेच्या पश्चात पती व लहान ३ मुले असून संपूर्ण परीवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलीस स्टेशन मिळाली असता पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच नाव भुजंग कन्नाके वय 52 असुन त्याला आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे पाठविले असून घटनेचा पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहेत.