कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायास ट्रकची धडक नापोशी गंभीर जखमी , उपचारासाठी नागपूर ला हलविले

1607

 

उपसंपादक/ अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे नाकेबंदी च्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायास ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना रात्रो 2.35चे सुमारास घडली.
गंभीर जखमी नायक पोलीस शिपाई गजानन ठाकूर वय 36असे असून आष्टी येथे चंद्रपूर रोडवर रात्रोचे नाकाबंदी पोलीस उपनिरीक्षक जंगले सहायक पोलीस उपनिरीक्षक वैरागडे यांच्यासह तिन पोलीस शिपाई व तिन सैनिक असे कर्तव्यावर असतांना अचानक रात्रो 2.35 वा. गोंडपिपरी कडून आलापल्ली कडे जात असलेले ट्रक क्रमांक TS 05 UD 2757 ला तपासणी करण्यासाठी अडविले असता चालकाने विरूद्ध दिशेला वाहन चालवून सरळ पोलीस शिपाई यांच्या अंगावर नेले व विजेच्या खांबाला धडक दिली.
लगेचच सहकारी पोलीसांनी ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले परंतू त्यांचे हात पाय मोडले व कमरेला ईजा झाल्याने चंद्रपूर ला पाठविण्यात आले . प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे समजते.
चालक विधी संघर्क्षीत बालक , शिवा हरीबाबू मलाडी रवी कुमार नटराज बसवा सर्व रा.अश्वरावपेठा जिल्हा बद्राद्री (तेलंगणा) असे असून विधी बालक वय १७ ट्रक चालवित असल्याचे सांगितले जात आहे
ट्रकचालकाविरूद्ध आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.