डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सादेपनाने साजरी करा:पोलिस निरीक्षण उमेश पाटिल

448

 

दखल न्यूज़ भारत@ शंकर महाकाली

बल्लारपुर : बल्लारपुर पोलीस स्टेशन मद्यये उमेश पाटील पोलीस निरीक्षण यांच्या मार्गदर्शनाथ डॉ बाबासाहेब जयंती समितीच्या पदाधिकारी विशेष बैठक घेण्यात आली.बैटकीत बल्लारपुर तहसीलदार संजय राईचवार,वानखेडे कर निर्धारण अधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांचे उपस्थितीत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व कोरोना विषाणू प्रादुर्भाव, कायदा सुव्यवस्था आबादीत राखन्याचे अनुषंगाने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे. हद्दीतील बौद्ध विहार मंडळ, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांची विषेश बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत महाराष्ट्र शासन तथा जिल्हा प्रशासनाचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्ताने निर्गमित मार्गदर्शक सूचना , कोरोना विषाणू प्रादुर्भाव सुरू असल्याने सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम अगदी मोजक्या समूदाय सह घेणे आहे, तरी सर्व बौद्ध समाज बांधवांनी शक्यतोवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम सामूहिक रीत्या न घेता,आप आपले घरीच वैयक्तिक रित्या घेऊन पूजा अर्चा,माल्यार्पण, व वंदना करावे असे सर्वांना आव्हान करण्यासाठी विनंती करण्यात आली. तरी पण परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता पाच पाच व्यक्तींचे समूहाने 14 एप्रिल 21 ला साडेसहा वाजता पासून येणार असल्याचे सर्वांनी सांगितले त्या दरम्यान कसली गर्दी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आव्हान केले आहे. तसेच
या उत्सवाच्या निमित्ताने कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्याने सामाजिक अंतर नियमाचे पालन करून सदर उत्सव शांततेत व सुरक्षित संपन्न होण्याचे दृष्टीने आवश्यक सहकार्य करावे अशी सर्वाना सूचित केले,सर्वानी दिलेल्या सूचना मान्य केले
सदर मिटिंग ला पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील,बौद्ध विहार मंडळ, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी असे 30 ते 40 व्यक्तीं उपस्थित होते .
सर्वाना परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव शुभेच्छा देऊन मिटिंग चा समारोप करण्यात आला.